नाग आणि नागिणीमधील अतूट प्रेमाची अजब घटना, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली यावर नागाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो तिच्या मृतदेहा जवळ फना उभारून बसला होता
माणूस असो किंवा पशु पक्षी सर्वामध्ये प्रेम हा अविभाज्य घटक आहे. नाग-नागीन मध्ये असलेले अतूट प्रेमाची अशीच एक अजब घटना नांदगाव मध्ये समोर आली असून कोब्रा जातीचे नाग-नागीनचा जोडपा टाईल्स बनविणाऱ्या कारखान्याच्या अवतीभवती फिरायचं मात्र अचानक नागीनचा मृत्यू झाला. आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली यावर नागाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो तिच्या मृतदेहा जवळ फना उभारून बसला होता. कारखान्यातील कामगारांनी हे दृश्ये पाहिल्यानंतर त्यांनी सर्प मित्राला बोलावले त्याने अथक प्रयत्न करून नागाला पकडल्यानंतर त्याला निसर्गाच्या सहवासात सोडले तर मयत झालेल्या नागीनला वन विभागाच्या हवाली केले
Published on: May 12, 2022 10:33 AM
Latest Videos