शुभ बोल नाऱ्या…, नारायण राणेंच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.आपलं नातं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासारखं नाही. बहोत पुराना रिश्ता है”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची 03 मे रोजी कणकवलीत सभा पार पडली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कोकणात येणार म्हटल्यावर कोणी तरी धमकी दिली. मराठीत एक म्हण आहे ‘शुभ बोल रे नाऱ्या’. ये पाहतो अशा धमक्या, तू येच तुला आडवा करतो. असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाव न घेता भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published on: May 04, 2024 11:30 AM
Latest Videos