शाळेच्या पहिल्याच दिवशी सहन करावा लागला विद्यार्थ्यांना त्रास; केटीईएस शाळेत घडला धक्कादायक प्रकार!

शाळेच्या पहिल्याच दिवशी सहन करावा लागला विद्यार्थ्यांना त्रास; केटीईएस शाळेत घडला धक्कादायक प्रकार!

| Updated on: Jun 15, 2023 | 1:43 PM

उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर राज्यातील शाळा आजपासून सुरू होत आहे. मात्र शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर ठेवल्याचा धक्कादाय प्रकार पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील केटीईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडला आहे.

पुणे : उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर राज्यातील शाळा आजपासून सुरू होत आहे. मात्र शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर ठेवल्याचा धक्कादाय प्रकार पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील केटीईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडला आहे.शालेय विद्यार्थ्यांनी शालेय फी न भरल्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या बाहेर राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. सुमारे एका तासापेक्षा जास्त वेळ या विद्यार्थ्यांना बाहेर ठेवण्यात आलं, यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला आहे. मात्र या विद्यार्थ्यांना बाहेर ठेवल्याने त्यांच्या मनावर काय परिणाम होतील, याचा विचार करण्याची गरज आहे.

 

Published on: Jun 15, 2023 01:43 PM