नागपूरात पावसाचा हैदोस; वीजेचे खांब, झाड पडल्याच्या अनेक घटना, दोघांचा मृत्यू

नागपूरात पावसाचा हैदोस; वीजेचे खांब, झाड पडल्याच्या अनेक घटना, दोघांचा मृत्यू

| Updated on: Apr 21, 2023 | 8:30 AM

शहारत दोघांचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काल झालेल्या सोसाट्याचा वारा, वादळ आणि पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडे पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत

नागपूर : उपराजधानीत गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटल्याने वीजेचे खांब, झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर शहारत दोघांचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काल झालेल्या सोसाट्याचा वारा, वादळ आणि पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडे पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे झाडे पडल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्याचवेळी विजेचे खांब पडल्याने अनेक भागात वीजही गेली.

Published on: Apr 21, 2023 08:30 AM