Sudhir Mungantiwar : कमळाबाई म्हणून हिणवणं 18व्या शतकातल्या बुद्धीचं द्योतक; मुनगंटीवारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Sudhir Mungantiwar : कमळाबाई म्हणून हिणवणं 18व्या शतकातल्या बुद्धीचं द्योतक; मुनगंटीवारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

| Updated on: Sep 03, 2022 | 4:30 PM

बाई, भाजपा अबला आहे, अशा पद्धतीचा भाव व्यक्त करणे म्हणजे 18व्या शतकातली मानसिकता आहे. कमळाबाई म्हटले म्हणजे भाजपाचा अवमान होईल, ही भावनाच बुद्धी कमी आहे, हे दाखवत असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर : भाजपाचे मुंबई अध्यक्ष  अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे यांच्या गटाला पेंग्विन सेना म्हणायचे का, असा सवाल पत्रातून विचारला होता.  भाजपाला कमळाबाई असे सामनातून हिणविले जाते, असे त्यांचे मत आहे. या मुद्द्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिले आहे. बाई म्हणत हिनविणे म्हणजे बाईचा, आईचा अपमान असून ज्यांची मानसिकता विकृत आहे, त्यांनी असा उल्लेख केला असेल, असा टोला मुनगंटीवार यांनी शिवसेनेला (Shivsena) लगावला आहे. अशांना सावित्रीबाई कधी समजल्याच नाहीत, असेही ते म्हणाले. बाई, भाजपा अबला आहे, अशा पद्धतीचा भाव व्यक्त करणे म्हणजे 18व्या शतकातली मानसिकता आहे. कमळाबाई म्हटले म्हणजे भाजपाचा अवमान होईल, ही भावनाच बुद्धी कमी आहे, हे दाखवत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Published on: Sep 03, 2022 04:29 PM