जिथे बॉम्ब फेकले जायचे, तिथे राहुल गांधी,प्रियांका गांधी बर्फाचे गोळे फेकतात, भाजप नेत्याचा टोला

“जिथे बॉम्ब फेकले जायचे, तिथे राहुल गांधी,प्रियांका गांधी बर्फाचे गोळे फेकतात”, भाजप नेत्याचा टोला

| Updated on: Jun 26, 2023 | 11:51 AM

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. "जिथे बॉम्ब फेकले जायचे तिथे राहुल गांधी, प्रियांका गांधी बर्फाचे गोळे फेकतात," असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

चंद्रपूर: भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये जिथे बॅाम्ब फेकले जायचे, आता त्याच ठिकाणी राहूल गांधी, प्रियंका गांधी बर्फाचे गोळे फेकत आहेत. जिथे जिथे काँग्रेसने अंधार जन्माला घातला तिथे प्रकाश येईल. चीन, पाकिस्तानला वाटते मोदी यांना हरवायला पाहिजे. आता आतंकवादी मोदी यांचं नाव ऐकले तर पळून जातात. वाघाला पकडण्यासाठी ताडोबाचे कितीही जनावरं एकत्र आले तरी जेव्हा वाघ डरकाळेल तेव्हा सर्व पळून जातील.काँग्रेसच्या हाताची शक्ती गेलीय.”

Published on: Jun 26, 2023 11:51 AM