सामना हे कुठं वृत्तपत्र आहे? मुनगंटीवार यांचे टीकेला उत्तर
मुनगंटीवार यांनी, सामना हे पोम्पल्टेट आहे ते काही वर्तमानपत्र नाही. त्यामुळे त्यांनी सरकारचं कौतुक करावं त्याने गुणगान करावं ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.
मुंबई : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून सरकारवर टीका करण्यात आली. महाराष्ट्राचा शेतकरी अवकाळी आणि गारपिटीने उद्ध्वस्त होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होळीत मग्न होते. सत्तेची भांग चढली की राज्यकर्ते असेच बेफाम वागतात. महाराष्ट्रात आज तेच चित्र आहे! अशी टीका करण्यात आली. त्या टीकेला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. मुनगंटीवार यांनी, सामना हे पॅम्पलेट आहे ते काही वर्तमानपत्र नाही. त्यामुळे त्यांनी सरकारचं कौतुक करावं त्याने गुणगान करावं ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. सामनातून टीका झाली त्याला उत्तर द्यायला कोणीही बांधील नाही असेही ते म्हणाले.
Published on: Mar 09, 2023 01:58 PM
Latest Videos