देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आणखी एका नेत्याचा गौप्यस्फोट; म्हणाला, “शरद पवार यांनी मंत्रीही ठरवले होते”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्यासोबत डबल गेम केला. राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता येणार होती. पण शरद पवार चार दिवस आधी मागे फिरले,"असं फडणवीस म्हणाले. त्यात आता भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवा दावा केला आहे.
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्यासोबत डबल गेम केला. राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता येणार होती. पण शरद पवार चार दिवस आधी मागे फिरले,”असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यात आता भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवा दावा केला आहे.शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती फायनल झाली होती. पवार साहेबांनी पालकमंत्री आणि जिल्हे वाटप सुद्धा केले होते. त्यानंतर ते माघार फिरले. देवेंद्र फडणवीस यांनी आज जे काही सांगितलं ते शंभर टक्के खरं आहे. शरद पवार यांचा जो काही राजकीय प्रवास आहे, इतिहास आहे, ते पाहिलं तर फडणवीस जे म्हणत आहेत ते खरं आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.