आळंदीच्या घटनेवरून सुधीर मुनगंटीवार यांचा मविआवर निशाणा; विरोधकाचा हा मायावी प्रयत्न!
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यासंबंधित घटनेवरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावरून आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यासंबंधित घटनेवरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावरून आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गृहमंत्री या घटनेकडे लक्ष देऊन आहेत योग्य चौकशी केली जाईल विरोधकांना त्यांचं नकली हिंदुत्व त्यांच्या लक्षात आलं. त्यांचं खुर्ची प्रेम आपण पाहिलं आहे. पालघरच्या संतांची हत्या झाली तेव्हा काय भूमिका होती.शर्जिल उस्मानी पुण्यात आला होता अगदी खालच्या भाषेत शिव्या देऊ गेला. पण कोणतीही कारवाई केली नाही. 2024 ला आपण निवडून येणार नाही हे विरोधकांना कळून चुकलं आहे. म्हणून आता फक्त आपण हिंदू आहोत दाखवलं जात आहे. आळंदीच्या घटनेवरून सरकारला बदनाम करून काही हिंदू मत आपल्याकडे वळवता येतील का हा मायावी प्रयत्न केला जात आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.