उद्धवसाहेब, ‘त्या’ कॉन्ट्रॅक्टर्सची अन् माझी नार्को टेस्ट करा, कळेल तुम्हाला खोके आले की मला!; ठाकरेंना ओपन चॅलेंज
Uddhav Thackeray Malegoan Sabha : उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवर शिवसेना नेते सुहास कांदे यांनी टीका केली आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : उद्धव ठाकरे यांची काल मालेगावमध्ये सभा झाली. या सभेवर शिवसेना नेते सुहास कांदे यांनी टीका केली आहे. तसंच त्यांनी ठाकरेंना ओपन चॅलेंजही दिलं आहे. आम्ही खोके घेतलेले नाहीत. हवंतर माझी नार्को टेस्ट करा, असं सुहास कांदे म्हणाले आहेत. तसंच मी ज्या कॉन्ट्रॅक्टर्सची नाव सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आय आर बी कंपनी आणि तुमची पण नार्को टेस्ट करा, म्हणजे कुणी खोके घेतले ते स्पष्ट होईल, असंही सुहास कांदे म्हणालेत.
Published on: Mar 27, 2023 08:12 AM
Latest Videos