Sujay Vikhe on Shivsena | अहमदनगरमध्ये शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही

Sujay Vikhe on Shivsena | अहमदनगरमध्ये शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही

| Updated on: Jun 12, 2022 | 7:58 PM

मी शिवसेनेवर कधीही टीका करणार नसून माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जरी कारवाई केली तरी चालेल मात्र मी शिवसेनेवर टीका करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या खासदारकीत 50 टक्के वाटा हा शिवसैनिकांचा आहे असे जाहीर वक्तव्य भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे कौतुक करत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला. यावेळी ते म्हणाले की, मी याआधी कधीही शिवसेनेवर टीका केली नाही, अथवा मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही कधी टीका केली नाही. कारण आजपर्यंतच्या माझ्या राजकीय वाटचालीत हा खरा वाटा शिवसैनिकांचा आहे. माझे कार्यकर्ते शिवसेनेत गेले तरी मला त्याचे वाईट वाटलं नाही. यापुढेही मी शिवसेनेवर कधीही टीका करणार नसून माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जरी कारवाई केली तरी चालेल मात्र मी शिवसेनेवर टीका करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आणि यापुढे कधी मी शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही असंही ते म्हणाले.

Published on: Jun 12, 2022 07:58 PM