पंकजा मुंडे भाजपात नाराज? सुजय विखे पाटील म्हणतात,”मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा”
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीदिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी "मी भाजप नाही. तर मी भाजप पक्षाची आहे. भाजप पक्ष खूप मोठा आहे. मला कोणत्या गोष्टीची भीती आहे? मला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही. काही झालं तर मी ऊस तोडायला जाईन आणि जानकर जातील फिरायला", असं सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीदिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी “मी भाजप नाही. तर मी भाजप पक्षाची आहे. भाजप पक्ष खूप मोठा आहे. मला कोणत्या गोष्टीची भीती आहे? मला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही. काही झालं तर मी ऊस तोडायला जाईन आणि जानकर जातील फिरायला”, असं सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान नुकतीच भाजप खासदार सुजय विखे आणि त्यांची भेट झाली होती त्यावेळी आपली काही चर्चा झाली का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुजय विखे म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्या मनातील विचार हे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून, चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवले आहे. त्यामुळे कोणताही नाराजीचा सूर नाही. उलट जुन्या गाण्याप्रमाणे ‘मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा’ असं ते आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित राहून काम करत आहोत”, असं सुजय विखे पाटील म्हणाले.