नाय, नो, नेव्हर, पवारांना आम्ही पाठिंबा देऊ ? त्यांचा आमचा संघर्ष...

नाय, नो, नेव्हर, पवारांना आम्ही पाठिंबा देऊ ? त्यांचा आमचा संघर्ष…

| Updated on: Aug 01, 2023 | 11:27 AM

भाजप आमदार राम शिंदे यांनी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले. सभापती निवडीवरून विखे पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला. राम शिंदे यांच्या आरोपावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

अहमदनगर : जामखेड बाजार समितीच्या सभापती निवडीनंतर भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजप आमदार राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले आहेत. सभापती निवडीवरून विखे पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला. राम शिंदे यांच्या आरोपावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. राम शिंदे यांच्या नाराजीवर पक्षश्रेष्ठी बोलतील. मात्र महाराष्ट्र साक्षीदार आहे, गेल्या  30 वर्षांपासून आमचा पवार कुटुंबाविरोधात संघर्ष आहे. त्यामुळे पवारांना विखे यांनी पाठिंबा दिला यावर कोणी विश्वास ठेवणार नाही’, असं सुजय विखे पाटील यांनी सांगितलं.

Published on: May 18, 2023 09:38 AM