Sujay Vikhe Patil | खाते कोणतेही द्या, नेटाने जबाबदारी पूर्ण करणार खातेवाटपाविषयी नाराजी नसल्याचे सुजय विखे पाटील यांचे मत

Sujay Vikhe Patil | खाते कोणतेही द्या, नेटाने जबाबदारी पूर्ण करणार खातेवाटपाविषयी नाराजी नसल्याचे सुजय विखे पाटील यांचे मत

| Updated on: Aug 13, 2022 | 4:05 PM

Sujay Vikhe Patil | भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील खाते वाटपावरुन नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Sujay Vikhe Patil | मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर (Oath Ceremony) आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushan Vikhe Patil) हे नगर जिल्ह्यात त्यांच्या मतदारसंघात (constituency) आज आले आहेत. त्यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यांच्या दौऱ्यानिमित्त भाजप नेते आणि खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हे ही जातीने सर्व लक्ष्य देत होते. यावेळी खातेवाटपाचा विषय काढला असता, राधाकृष्ण विखे पाटील यांना पहिल्याच फळीत मंत्रिपदाची शपथ देण्यात आली, यातचे सगळं आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापूर्वी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक खाती सांभाळली आहेत. त्यामुळे महसूल खातेच मिळावे म्हणून ते काही अडून बसलेले नाहीत वा तशी काही त्यांची नाराजी ही नसल्याचे सूजय विखे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती नेटाने पार पाडू असे त्यांनी यावेळी सांगितले.

Published on: Aug 13, 2022 04:05 PM