काही दिवसांपासून असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय; सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया

“काही दिवसांपासून असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय”; सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 05, 2023 | 1:17 PM

राहुरी येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात भाजपचे आमदार नितेश राणे आणि खासदार सुजय विखे पाटील देखील सहभागी झाले आहेत.

अहमदनगर, 5 ऑगस्ट 2023 | जिल्ह्यातील राहुरी येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात भाजपचे आमदार नितेश राणे आणि खासदार सुजय विखे पाटील देखील सहभागी झाले आहेत. यावेळी सुजय विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “काही दिवसांपासून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आपली भावना व्यक्त करण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. लव्ह जिहादचे प्रकार थांबावे ही प्रमुख मागणी आहे.असे प्रकार फक्त नगर जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे.नगर जिल्हा लव्ह जिहादचा हॉटस्पॉट नाही. धर्मांतर आणि लव्हजिहाद विरोधी कायदा केला पाहिजे.संविधानाला सुरक्षित ठेवून आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहासाठी नवीन कायदा आणला पाहिजे.राज्य आणि केंद्र सरकारने देखील कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील रहावे.”

Published on: Aug 05, 2023 01:17 PM