कोकणात जाताय? दिवा-रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत झालाय बदल
मध्य आणि कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे दिवा-पॅसेंजरच्या प्रवासवेळेत घट झाल्याने मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आता परिक्षांचा हंगाम संपत आला असून सुट्ट्यांची सुगी सुरू होईल. अनेक चाकरमाने हे उन्हाळी सुट्टीनिमित्त सहकुटुंब कोकणाकडे जातील. अशा वेळी जे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून जे प्रवास करतात त्यांच्यासाठी खास बातमी आहे. दिवा-रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सायंकाळी ५.५० वाजता रवाना होणार असून, रात्री १२.३० वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे दिवा-पॅसेंजरच्या प्रवासवेळेत घट झाल्याने मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही पॅसेंजर दुपारी ३.२० मिनिटांनी रवाना होते व रत्नागिरी स्थानकात रात्री १२.३० वाजता पोहोचते.
Published on: Mar 15, 2023 08:39 AM
Latest Videos