सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाई फेकल्याने बारामतीत खळबळ

सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाई फेकल्याने बारामतीत खळबळ

| Updated on: Feb 11, 2024 | 5:55 PM

राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह अजित गटाला बहाल करण्याचा निर्णय नुकताच निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यातच या प्रकरणी सर्वाच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय शरद पवार गटाने यांनी घेतला आहे. यातच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पोस्टवर शाईफेक करण्याचा प्रकार घडला आहे.

बारामती | 11 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट होऊन दोन गट पडल्यानंतर नुकतेच पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याच वेळी यंदा सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवार गट कोणाला उमेदवारी देतात याची चर्चा सुरु असतानाच काल रात्री एक खळबळजनक घटना घडली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पत्नी सूनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर अज्ञातांनी रात्री शाईफेकल्याचे उघडकीस आले आहे. अजित पवार यांच्या फॉर्म हाऊस बाहेर हे पोस्टर लावण्यात आले असताना काल रात्री हा प्रकार घडल्याने या प्रकरणी पोलिसांना तातडीने हे पोस्टर तेथून हटविले आहे.तसेच या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. दरम्यान या प्रकरणात खासदार शरद पवार यांनी लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूकीत उभारण्याचा हक्क असल्याचे म्हटले आहे. तर हा प्रकार चुकीचा असून या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

 

Published on: Feb 11, 2024 05:53 PM