Video | सुनेत्रा पवार यांच्यानंतर आता सुप्रिया सुळे यांचा देखील रथाद्वारे प्रचार, बारामतीत नणंद-भावजय सामना

Video | सुनेत्रा पवार यांच्यानंतर आता सुप्रिया सुळे यांचा देखील रथाद्वारे प्रचार, बारामतीत नणंद-भावजय सामना

| Updated on: Feb 18, 2024 | 1:32 PM

बारामती लोकसभा निवडणूकीकडे भाजपाने यंदा जास्त लक्ष पूरविण्याचा इरादा याआधीच जाहीर केला होता. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांना गेल्या निवडणूकीत विजय मिळविताना अवघड गेले होते. भाजपाने यंदा थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अजित पवार यांना गळास लावून शरद पवारांना त्यांच्या बारामतीतच शह देण्यासाठी पुतण्याचाच वापर करण्याचे ठरविले आहे. बारामतीत यंदा नणंद-भावजय असा सामना पाहायला मिळणार आहे.

बारामती | 18 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणूकीची घोषणा केव्हाही होऊ शकते. राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावाच्या यादीवर अंतिम हात फिरविला जात आहे. अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर झाले आहेत. परंतू बारामतीत प्रचाराचा धुरळा उडाला आहे. भाजपाने राष्ट्रवादी पक्ष फोडल्यानंतर आता अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. बारामतीत नात्यात संघर्ष होणार आहे. नणंद विरोधात भावजय असा सामना होणार आहे. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी विकास  रथ फिरु लागला आहे. त्यातच आता येथील खासदार सुप्रिया पवार यांचा देखील प्रचार रथ तयार करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या रथाला एलईडी स्क्रीन लावली आहे. सुप्रिया सुळे यांना  संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. या रथामधून संसदेत केलेल्या कामाचा प्रचार खासदार सुप्रिया सुळे करीत आहेत. पवार कुटुंबियांच्या बारामतीतील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Published on: Feb 18, 2024 01:23 PM