ठाकरेंच्या पोस्टरवर 'धर्माभिमानी' उल्लेख, महंत सुनील महाराज म्हणतात, खरे हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेच

ठाकरेंच्या पोस्टरवर ‘धर्माभिमानी’ उल्लेख, महंत सुनील महाराज म्हणतात, “खरे हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेच”

| Updated on: Jul 09, 2023 | 2:09 PM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं.

यवतमाळ: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागताच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे यांचा ‘धर्माभिमानी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंना विरोधक हिंदुत्व सोडलं, धर्म सोडला म्हणून बोलतात, मात्र खरे हिंदुत्ववादी हे उद्धव ठाकरेच आहेत, त्यामुळे धर्माभिमानी म्हणून त्यांचा आम्ही आज उल्लेख केलाय, असं पोहरा देवीचे महंत सुनील महाराज यांनी सांगितले.

Published on: Jul 09, 2023 02:09 PM