Sunil Prabhu | 'माझा व्हिप शिवसेनेच्या प्रत्येक सदस्याला लागू'-tv9

Sunil Prabhu | ‘माझा व्हिप शिवसेनेच्या प्रत्येक सदस्याला लागू’-tv9

| Updated on: Aug 17, 2022 | 11:41 AM

सुनिल प्रभू यांनी मी शिवसेनेचा मुख्य प्रतोद आहे, तशी विधिमंडळाच्या दफ्तरी नोंद आहे. त्यामुळे तो शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना लागू आहे असं म्हटलं आहे.

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आठ दिवस चालणार आहे. मात्र त्यापुर्वीच शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या सुनिल प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला आहे. तसेच अधिवेशनाच्य काळात सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर बोलताना, सुनिल प्रभू यांनी मी शिवसेनेचा मुख्य प्रतोद आहे, तशी विधिमंडळाच्या दफ्तरी नोंद आहे. त्यामुळे तो शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना लागू आहे असं म्हटलं आहे.

Published on: Aug 17, 2022 11:41 AM