Sunil Prabhu | गोविंदांच्या विमा योजनेची अंमलबजावणी कशी होणा याची माहिती द्यावी- tv9

Sunil Prabhu | गोविंदांच्या विमा योजनेची अंमलबजावणी कशी होणा याची माहिती द्यावी- tv9

| Updated on: Aug 18, 2022 | 11:25 AM

उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या गोविंदांना दहा लाखाचा विमाचा प्रश्न उपस्थित केला.

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून आज त्याचा दुसरा दिवस आहे. काल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची कोणतीच संधी सोडली नाही. तर आज देखील तशीच रणनिती आखली जात असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या गोविंदांना दहा लाखाचा विमाचा प्रश्न उपस्थित केला. तर यासंदर्भात अजूनही कोणतीही माहिती गोविंदा मंडळापर्यंत पोहोचलेली नसल्याचे म्हटलं आहे. तर यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन जारी करून द्यावी याबाबत आपण अधिवेशनात मागणी कऱणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.

Published on: Aug 18, 2022 11:25 AM