उद्धव ठाकरेंसाठी ठाकरेंसाठी हा मावळा उभा ठाकला; म्हणाला, हेच आमचं कर्तव्य

उद्धव ठाकरेंसाठी ठाकरेंसाठी हा मावळा उभा ठाकला; म्हणाला, “हेच आमचं कर्तव्य”

| Updated on: Jun 06, 2023 | 11:01 AM

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ठाकरे गटाचे नेते आज छत्रपती शिवाजी महाराज टार्मिनल येथे उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी सुनील प्रभू यांनी आपण उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं.

मुंबई : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ठाकरे गटाचे नेते आज छत्रपती शिवाजी महाराज टार्मिनल येथे उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी सुनील प्रभू यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं. “छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे नाही तर जगाचे आदर्श आहेत. स्वराज्याच्या स्थापनेनंतर जो राज्याभिषेक झाला, तो संपूर्ण देशाला आणि जगाला दिशा दाखवणारा होता त्याचा हा आनंद सोहळा आहे.आणि त्यानंतर पुन्हा एकदा नतमस्तक होऊन या ठिकाणी राज्याभिषेक होत आहे हा आनंद आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आशीर्वाद प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये आहेत.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे व त्यांना सामर्थ्य देणं हेच आमचं काम आहे”, असं सुनील प्रभू म्हणालेत.

Published on: Jun 06, 2023 11:01 AM