Sunil Raut | हे तर दामिनी सिनेमा सारखं तारीख पे तारीख, आमदार सुनील राऊत यांची संजय राऊतांच्या कोठडींवर तिखट प्रतिक्रिया
Sunil Raut | संजय राऊत यांच्या ईडीच्या कोठडीविषयी आज सुनावणी होती, त्यावर आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sunil Raut | ‘ दामिनी पिक्चर पाहिला का? तारीख पे तारीख, असं सगळं सुरु आहे.’ शिवसेनेचे आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी ही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अर्थातच मुद्दा आहे तो, शिवसेनेचा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कोठडीवरील (Custody) सुनावणीचा. आज ही सुनावणी होती. राऊत यांना दिलासा मिळाला नाही. विशेष म्हणजे राऊत यांच्यातर्फे जामीनासाठी (Bail Application) कुठलाही अर्ज केला नसल्याचा दावा सुनील राऊत यांनी केला आहे. त्यामुळे ईडीचा (ED) वापर केला तरी आपण झुकणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर शिवसेना ही एकच आहे. ती बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची आहे. जे शिवसेनेत असल्याचा दावा करत आहेत, त्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटावे असा टोला ही त्यांनी संतोष बांगर (Santosh Bangar) यांना लगावला.
Published on: Aug 22, 2022 05:12 PM
Latest Videos