मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? राष्ट्रवादीच्या आमदाराने डारेक्ट वेळच सांगून टाकली…
राज्य मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. त्यात आता अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाल्यानंतर कोणाला कोणतं पद मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. त्यात आता अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाल्यानंतर कोणाला कोणतं पद मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली घडत आहे. मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत बैठका सुरु आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल दिल्लीलाही गेले होते. या सगळ्या घडामोडींदरम्यान अजित पवार गटाचे आमदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “आम्ही एकसंघाने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही वेळेला काही गोष्टींमध्ये थोडासा वेळ होऊ शकतो. पण कुठल्याही प्रकारचा समज-गैरसमज न राहता स्पष्टपणाची भूमिका घेऊन एका ताकदीने पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार, पालकमंत्री याबाबतचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळेल.”