अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? राष्ट्रवादीच्या खासदाराचं मोठं विधान; म्हणाला…
अजित पवार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. अमोल मिटकरी यांच्या ट्विटनंतर आता सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
पुणे, 24 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. अमोल मिटकरी यांच्या ट्विटनंतर आता सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारमध्ये आम्ही जेव्हा सहभागी झालो तेव्हाच मुख्यमंत्री पदावरून स्पष्टता झाली आहे. आम्ही एनडीएचे घटक आहोत. मुख्यमंत्री पद दादांना मिळावे, अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे. मात्र, आता आम्ही महायुती केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचाचा विषय नाही.”
Published on: Jul 24, 2023 09:39 AM
Latest Videos