ठाण्यातील पट्ट्यावरून वाद; सुनिल तटकरे यांचा माजी सहकाऱ्यावर टोला, म्हणाले, ‘काही माणसं प्रसिद्धीसाठी’

ठाण्यातील पट्ट्यावरून वाद; सुनिल तटकरे यांचा माजी सहकाऱ्यावर टोला, म्हणाले, ‘काही माणसं प्रसिद्धीसाठी’

| Updated on: Jul 16, 2023 | 12:40 PM

त्यानंतर आव्हाड यांचे ठाण्यात ठाण्याचा पट्टा साहेबांचा निष्ठांवत असे बॅनर लागले होते. आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरमधून अजित पवार यांच्या त्या टीकेली चोख प्रत्युत्तर दिलं होतं.

ठाणे | 16 जुलै 2013 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आव्हाड यांचे ठाण्यात ठाण्याचा पट्टा साहेबांचा निष्ठांवत असे बॅनर लागले होते. आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरमधून अजित पवार यांच्या त्या टीकेली चोख प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना आता ठाण्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. यावरूनच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आव्हाड यांना टोला लगावताना, मी याबाबत फारसं बोलून कोणाचं महत्व वाढू इच्छित नाही. काही माणसं प्रसिद्धीसाठी खूप आतुरलेली असतात. काही ना काही, वक्तव्य करण्याशिवाय आपला चेहरा टीव्ही वरती दिसत नाही अशी माणसं काही वेळा अशी बेताल वक्तव्य करतात यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही असा टोला तटकरे यांनी लगावला आहे.

Published on: Jul 16, 2023 12:40 PM