“अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचा कणा”, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
राष्ट्रावादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली खंत व्यक्त केली. मला विरोधी पक्षनेते पदाच फार इंटरेस्ट नव्हता, मला यातून मुक्त करा आणि संघटनात्मक जबाबदारी द्या अशी मागणी केली. यावेळी अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर अप्रत्यक्षरित्या दावा केल्याची म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती : राष्ट्रावादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली खंत व्यक्त केली. मला विरोधी पक्षनेते पदाच फार इंटरेस्ट नव्हता, मला यातून मुक्त करा आणि संघटनात्मक जबाबदारी द्या अशी मागणी केली. यावेळी अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर अप्रत्यक्षरित्या दावा केल्याची म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचा कणा आहेत. संबंध महाराष्ट्रात गेल्या पंचवीस वर्षात पक्ष उभारणीत त्यांचे योगदान मोठे आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी भावना व्यक्त केली आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. उद्याच्या राजकारणात पक्षाची आव्हानात्मक स्थितीत होणारी वाटचाल, याबाबतची त्यांची भावना त्यांनी स्पष्टपणे मांडली,” असं तटकरे म्हणाले.