100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 3 October 2022 -TV9

100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 3 October 2022 -TV9

| Updated on: Oct 03, 2022 | 9:06 AM

दमदाटी करणाऱ्यांची सत्ता जाणार. आमची सत्ता कधी येईल हे कळणारही नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनो कोणत्याही दबावाला बळी पडू नका असे अजित पवार म्हणाले.

जळगावच्या राजकारणात दोन टोकाच्या दिशा आता एकत्र येणार असल्याच्या राजकीय चर्चांना उत आला आहे. याचदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत मोठा खूलासा केला आहे. तर फडणवीस, तुम्ही आणि मी बसून मिटवून घेऊ असं एकनाथ खडसे यांनी म्हटल्याचं महाजन म्हणाले. तर दमदाटी करणाऱ्यांची सत्ता जाणार. आमची सत्ता कधी येईल हे कळणारही नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनो कोणत्याही दबावाला बळी पडू नका असे अजित पवार म्हणाले. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. तर 50 खोके घेतले असतील तर मग मंत्रीपद कशाला हवं असा सवाल केला आहे. तर भंडारा जिल्ह्याच्या नियोजन बैठकीसाठी नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकत्र येणार आहेत. सकाळा 11 वाजता ही बैठक होणार आहे. तर गृहिणींना दिलासा देणारी बातमी असून सुर्यफूल आणि पामतेलाच्या किंमती उतरल्या आहेत. सुर्यफूल आणि पामतेलाच्या किंमतीत 40 ते 50 रूपये घट झाली आहे.

Published on: Oct 03, 2022 09:06 AM