दिवाळी कीटसह नुकसान भरपाईच्या बातम्यांचा घ्या आढावा सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. याची आठवण करून देत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखिल राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे.
राज्यात परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्याची नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यावर कालच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचे युद्ध पातळीवर पंचनामे करावेत असे आदेश दिले होते. त्यानंतर आता कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखिल नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पुढील 15 दिवसांत मदत दिली जाणार असल्याचे म्हटलं आहे. याचदरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. याची आठवण करून देत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखिल राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. तर पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवा यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच दिवाळी कीट दिवाळीनंतर लोकांना मिळून काय उपयोग असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. तर सातारामधील दस्तगीर भागात जंगली तरस पहायला मिळाले आहे. यावेळी तरस नागरीवस्तीत आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.