मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात भेट. काय झाली चर्चा? पहा सुपरफास्ट 50 न्यूज
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी केली. यामागणीबरोबरच अजित पवार यांनी कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोध दर्शवावा अशी मागणीही केली आहे.
राज्यात परतीच्या पावसाने हैदोस घातला असून अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसना भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला लवकरात लवकर पंचनामे पुर्ण करावेत आणि नुकसना भरपाई देत तातडीनं मदत करावी असे आदेश दिले आहेत. याचदरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी केली. यामागणीबरोबरच अजित पवार यांनी कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोध दर्शवावा अशी मागणीही केली आहे. यादरम्यान बुलढाण्याच्या भिवगाव येथे एका तरूणाला पुराच्या पाण्यातून मोटार सायकल नेने चांगलेच महागात पडले असते. यावेळी काही स्थानिकांनी त्याची मोटारसायकल पकडल्याने तो वाहूण जाताना बचावला. तर पुण्यातील रस्त्यात पडलेल्या खड्यांमुळे युवासेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यावेळी युवासेनेनं आंदोलन करत खड्ड्यात झाडं लावून निषेध व्यक्त केला.