परतीच्या पावसाने कुठे काय झालं पहा नव्या अपडेट सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये

परतीच्या पावसाने कुठे काय झालं पहा नव्या अपडेट सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये

| Updated on: Oct 22, 2022 | 5:28 PM

उद्धव ठाकरे हे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर निघणार आहेत. तसेच ते तेथे जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार करत अेक ठिकाणी नुकसान केलं आहे. तर शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास पावसामुळे हिरावला आहे. यातुन बाहेर पडण्यासाठी शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचे युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता उद्धव ठाकरे हे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर निघणार आहेत. तसेच ते तेथे जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यान बीडमध्ये शेतकऱ्यांचा असंतोष पहायला मिळाला. शेतकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांचा ताफा अडवला. यावेळी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये काही काळ तणाव पहायला मिळाला. तर शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूनमधील घरावर झालेल्या हल्ल्याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतले आहे. तर हल्ल्यामागील तपास करण्यासाठी पोलीसांनी श्वान पथकाची मदत घेतल्याचेही समोर आले आहे. तर परतीच्या पावसामुळे कोल्हापूर सह सांगलीमधील अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे. तर येथील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे.

 

Published on: Oct 22, 2022 05:28 PM