राज्यातीस राजकारण आणि इतर बातम्यासंह पहा सुपरफास्ट 50 न्यूज

राज्यातीस राजकारण आणि इतर बातम्यासंह पहा सुपरफास्ट 50 न्यूज

| Updated on: Oct 24, 2022 | 3:09 PM

परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास नेला. त्यामुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

भू-विकास बँकच्या कर्जातून अनेक शेतकऱ्यांच्या सुटकेचा शिंदे सरकारने निर्णय घेतला. तर यानिर्णयामुळे सुमारे 900 कोटी हून अधिक कर्जाची रक्कम माफ होणार आहे. याचबरोबर बँकेच्या जागा खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारींवर जागा सिल करण्यात आल्या आहेत. यानंतर भू-विकास बँक प्रकरणी शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता टीका केली आहे. तसेच पवार यांनी लबाडांचं आवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही असेही ते म्हणाले. तर परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास नेला. त्यामुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून टीका केली आहे. तसेच ठाकरे यांनी औरंगाबादला जात 24 मिनिटांत नेमकी काय पाहणी केली असा सवालही बारणे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी यावेळी दापावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य यांनी मशालीचा फोटो ट्वीट करत दीपावलीच्या दिनी ज्योत नवी पेटवू अशी शुभेच्छा दिल्या आहेत.