पहा राज्यातील अपडेट सुपरफास्ट 50 न्यूज सोबत
हिंगोलीत पीक विमा कंपनीची आमदार संतोष बांगर यांच्यासह शेतकऱ्यांनी तोडफोड केली. तर आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी येथे कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही तोडफोड केली.
राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ही झालं आहे. तर शेतकऱ्यांनी त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. तर यावर पीक विमा कंपन्यांही अजूनही कारवाई केलेली नसल्याचे समोर येत आहे. यावर हिंगोलीत पीक विमा कंपनीची आमदार संतोष बांगर यांच्यासह शेतकऱ्यांनी तोडफोड केली. तर आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी येथे कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही तोडफोड केली. तर सोलापूर विद्यापीठात अभाविपनं आंदोलन केलं. तसेच येथे प्रतिकात्मक यज्ञ करत शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न अभाविपकडून सोलापूर विद्यापीठात करण्यात आला. दरम्यान राज्याच्या अनेक भागात पावसाने मुक्काम वाढवल्याचे पहायला मिळत आहे. पुण्याच्या पिंपरीमध्ये आजही पावसाने हजेरी लावली. तर वाशिममध्येही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे येथील सोयाबिन पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.