पालघर साधू हत्या प्रकरण सीबीआयकडे जाणार, यासह इतर अपडेट पहा सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये
पालघर साधू हत्या प्रकरण हे सीबीआयकडे जाणार आहे. यासंदर्भात शिंदे सरकारने हा तपास सीबीआयकडे देण्यास तयारी दर्शवली आहे. याबाबत राज्य शासनाने तसे प्रतिज्ञा पत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे.
काही दिवसांवरच दिवाळी सण आला असून एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र अंधारातच होण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे 20 हजार कर्मचाऱ्यांना अद्यापही पगार मिळालेला नाही. त्यामुळे पगार न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तर अमरावतीतील परतवाडा परिसरात ईद ए मिलादच्या वेळी आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर इतरांचा शोध सुरू असल्याते पोलिसांनी सांगितलं आहे. यादरम्यान पालघर साधू हत्या प्रकरण हे सीबीआयकडे जाणार आहे. यासंदर्भात शिंदे सरकारने हा तपास सीबीआयकडे देण्यास तयारी दर्शवली आहे. याबाबत राज्य शासनाने तसे प्रतिज्ञा पत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. दरम्यान जळगावमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करावेत. तसेच लवकर नुकसान भरपाई द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. नाशिक शहरात वाढलेले शुभेच्छा फलक महापालिकेने हटवले. यासंदर्भात आयुक्तांनी दिले. तर सोलापुरात ऑनलाईन अॅपद्वारे 500 कोटींची फसवणुक झाल्याचा दावा केला आहे.