कधी होणार पंचनामे, शेतकरी नाराज. कुठं आहे ही स्थिती पहा सुपरफास्ट 50 न्यूज

कधी होणार पंचनामे, शेतकरी नाराज. कुठं आहे ही स्थिती पहा सुपरफास्ट 50 न्यूज

| Updated on: Oct 18, 2022 | 5:20 PM

नागपूरात मनसेच्या बँनरवरून राजकारण गरम झाले आहे. येथील रवी भवन परिसरात लावलेले मनसेचे बँनर सार्वजनिक विभागाने उतरवले होते. पण त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी ते पुन्हा लावले. त्यावरून आता ज्यांनी हे बँनर लावले त्यांच्याविरोधात नोटीस बजावण्यात येणार आहे.

राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालात भाजपने सरशी केली. त्यानंतर गडचिरोलीत देखील भाजपने मुंसडी मारली आहे. 21 पैका 5 ग्रामपंचायतींवर भाजपने आपले कमळ फुलवले आहे. तर अपक्षांनी 2 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील 2 ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व निर्माण केलं आहे. दरम्यान नागपूरात मनसेच्या बँनरवरून राजकारण गरम झाले आहे. येथील रवी भवन परिसरात लावलेले मनसेचे बँनर सार्वजनिक विभागाने उतरवले होते. पण त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी ते पुन्हा लावले. त्यावरून आता ज्यांनी हे बँनर लावले त्यांच्याविरोधात नोटीस बजावण्यात येणार आहे. यादरम्यान परतीच्या पावसाने अनेक भागात पाणीच पाणी केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे झालेल्या परतीच्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र आदेशानंतरही पंचनामे होत नसल्याने शेतकरी नाराज झाल्याचे दिसून येत आहे. तसेच ऐन दिवाळीत एसटीचे दर वाढवण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आहे.

 

Published on: Oct 18, 2022 05:20 PM