SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 16 June 2021
येडेश्वरी साखर कारखान्याने यंदा सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केलं होतं. हीच साखर पॅकिंग करून गोदामात स्टोअर करण्यात आली होती. मात्र, मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने कारखान्याच्या गोदामातील सर्व साखर भिजून गेलीय.
राज्यात मान्सूनचं (Mansoon update) आगमन झालंय. राज्याच्या विविध भागांत मान्सून सरी कोसळत आहे. मात्र काही भागांत पावसाने सुरुवातीलाच कहर दाखवायला सुरुवात केली आहे. बीडच्या केज तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय. परिणामी केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामामध्ये पावसाचं पाणी शिरल्याने 30 हजार साखरेचे पोते पाण्यानं भिजली आहेत. यामध्ये पंधरा हजार क्विंटल साखर भिजल्याने करोडो रुपयांचं नुकसान झालंय.
येडेश्वरी साखर कारखान्याने यंदा सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केलं होतं. हीच साखर पॅकिंग करून गोदामात स्टोअर करण्यात आली होती. मात्र, मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने कारखान्याच्या गोदामातील सर्व साखर भिजून गेलीय.
Published on: Jun 16, 2021 08:25 AM
Latest Videos