Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 27 June 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 27 June 2021

| Updated on: Jun 27, 2021 | 8:46 AM

रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. दुपारी 4 नंतर तसेच शनिवाी व रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत फक्त घरपोच सेवा सुरु राहिल.

राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण कमी झाले असले तरी नव्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन प्रशासन खबरदारी घेताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेनेही याच पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू केले आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांमधील दुकानं आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक दुकानां व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. ही दुकानं शनिवार व रविवार पूर्णत: बंद राहतील. मॉल, सिनेमागृह नाट्यगृह संपूर्णतः बंद राहणार आहेत

रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. दुपारी 4 नंतर तसेच शनिवाी व रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत फक्त घरपोच सेवा सुरु राहिल. प्रत्यक्ष जाऊन पार्सल घेणे बंद राहील, सर्व रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट इत्यादींना दर्शनी भागावर बाहेरील बाजूस एकूण आसनक्षमता आणि 50 टक्के प्रमाणे परवानगी असलेली आसन क्षमता यांचा बोर्ड लावावा लागणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या सुचनांचे स्टीकर्स लावणे देखील बंधनकारक असणार आहे.