15 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला, यासह पहा इतर अपडेटसह सुपरफास्ट 50 न्यूज
पुण्याच्या शिवाजी नगर आणि स्वारगेट डेपोच्या बाहेर एसटी बससच्या रांगा पहायला मिळत आहेत. येथे इंधन नसल्यामुळे अशा रांगा लांबच्या लांब लागल्या. तर इंधन नसल्याने लाखो रूपयांचे नुकसान होत असून वाहतुकही विस्कळीत झाली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कार्मचाऱ्यांचा पगार झाला नव्हता. त्यामुळे कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच लवकरात लवकर पगार करण्याची मागणी देखिल त्यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता 15 हजार एसटी कार्मचाऱ्यांचा पगार हा जमा करण्यात आला आहे. दरम्यान आता दिवाळी दिवसांवर आली असतानाच महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. तर डाळी महाग झाल्या आहेत. तर पुण्याच्या शिवाजी नगर आणि स्वारगेट डेपोच्या बाहेर एसटी बससच्या रांगा पहायला मिळत आहेत. येथे इंधन नसल्यामुळे अशा रांगा लांबच्या लांब लागल्या. तर इंधन नसल्याने लाखो रूपयांचे नुकसान होत असून वाहतुकही विस्कळीत झाली आहे. यादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. तर भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडला आहे. ज्यामुळे धरानाचे 19 दरवाजे हे उघडण्यात आले आहेत. तर सातारा जिल्ह्यात ही झालेल्या दमदार पावसामुळे कोयना धरणाचेही दरवाजे उडण्यात आले आहेत. तर सांगली जिल्ह्यात लम्पी बाधीत जनावरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर आतापर्यंत लम्पीमुळे 46 जनावरांचा मृत्यू जिल्ह्यात झाला आहे.