Bullock Cart Race : भिर्रर्रर्र…. हुर्ररररर…! बैलगाडा शर्यतींच्या मार्गातील अडथळे दूर, मार्ग झाला मोकळा; राज्यात जल्लोषाचं वातावरण
तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारच्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज निकाल आला आणि राज्यासह तामिळनाडूमध्ये एकच जल्लोष केला जात आहे.
पिंपरी चिंचवड : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारच्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज निकाल आला आणि राज्यासह तामिळनाडूमध्ये एकच जल्लोष केला जात आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारने ‘जल्लीकट्टू’ आणि बैलगाडी शर्यतींना परवानगी देण्यासाठी केलेल्या कायद्याला आव्हान देण्यात आले होतं. त्यावर निर्णय देताना बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील दिला. हा निकाल न्यायमूर्ती केएम जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठाने निकाल दिला आहे. यानंतर राज्यभरात सगळीकडे फटाके फोडून तर गुलाल उधळून या निर्णयाचे स्वागत केलं जात आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी देताच पिंपरी चिंचवड शौकिनांनी जल्लोष साजरा केलाय. बैलजोड्या थेट घाटात आणून भंडारा उधळत निर्णयाचे स्वागत केले आहे. पहा हा जल्लोष