सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश N. V. Ramana यांच्या Ceremonial Bench चे कामकाजचे live striming
सरन्यायाधीश रमणा हे आज निवृत्त होत असून त्यांचा शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने एक दिवसासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कामकाजाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. सरन्यायाधीश रमणा हे आज निवृत्त होत असून त्यांचा शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने एक दिवसासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. देशभरातल्या सर्व नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कसे चालते हे यानिमित्ताने पाहता येणार आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने लाईव्ह स्ट्रीमिंग संदर्भात काम सुरू केलं आहे. मात्र निकाल देणारी जी खंडपीठ याचं मात्र लाईव्ह स्टिमिंग होणार नाही. तसे भविष्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे हे थेट प्रक्षेपण किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग कायमस्वरूपी होऊ शकते. तर देशाचा जर विचार केला तर गुजरात, ओरिसा, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश किंवा पटना उच्च न्यायालय ही उच्च न्यायालयांकडून यापूर्वीच youtube चैनल द्वारे थेट प्रक्षेपण केलं गेलं आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हे प्रक्षेपण होणार आहे.