Maharashtra Poltical Crisis : …तोपर्यंत सरकारला धोका नाहीच; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
त्यांनी 145 आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे. तोपर्यंत या सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नाही असं अजित पवार म्हणालेत.
मुंबई : 11 महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Power Crisis) सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद करण्यात आला. यानंतर 16 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ठाकरे गट, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने वकिलांनी जोरकसपणे बाजू मांडली. यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. यानिकालावरच शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्य राहणार आहे. याच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी 145 आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे. तोपर्यंत या सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नाही असं अजित पवार म्हणालेत. तर निकाल काहीही लागला, तरी माझं स्वत:चं मत आहे. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे. कदाचित हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं जाईल अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा महाफैसला काय येतो याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.