रिजनेबल कालावधी प्रमाणे निर्णय झाला नाही तर….; राष्ट्रवादी नेत्याचा नार्वेकर यांना इशारा
16 आमदार अपात्रतेचा चेंडू हा पुन्हा एकदा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे गेला आहे. त्यावर त्यांना रिजनेबल कालावधी निर्णय घेण्याच्या सुचना न्यायालयाने केल्या आहेत.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल देताना दोन गोष्टींचा योग्य विचार करून निकाल द्यावा असं विधानसभा अध्यक्षांना सांगितलं आहे. 16 आमदार अपात्रतेचा चेंडू हा पुन्हा एकदा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे गेला आहे. त्यावर त्यांना रिजनेबल कालावधी निर्णय घेण्याच्या सुचना न्यायालयाने केल्या आहेत. तसेच जुलै 2022 मध्ये काय परिस्थिती होती त्या आधारावर निर्णय घ्यावा, त्यावेळी शिवसेना पक्ष कुणाचा होता यावर आधी निर्णय घ्यावा असे सांगितलं आहे. त्यावरून नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देण्यासाठी 10 महिने घेतले, त्यामुळे मी दोन महिन्यांतच कसा निर्णय देणार? तरी या प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू, स्पष्ट केले. त्यावरून आता पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याचमुद्द्यावरून नार्वेकर यांच्यावर निशाना साधत इशारा दिला आहे. त्यांनी, सुप्रीम कोर्टाने रिजनेबल कालावधीत निर्णय घ्या अस म्हटलंय आता तो निर्णय या सरकारचा कालावधी संपेपर्यत नसावा याची काळजी अध्यक्षांनी घ्यावी असा टोला लगावला आहे. तर रिजनेबल कालावधीत यावर निर्णय घेतला नाही तर ठाकरे गट त्यांच्या दारावर पुन्हा जाईल असा इशाराही दिला आहे.