शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळचा विस्तार लवकच…? पण, बच्चू कडू म्हणाले…
त्यामुळे राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता शिंदे गटातील आणि भाजपच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत.
मुंबई : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गुरुवारी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील महिन्याभरापासून राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) हे आता पडणार नाही हे पक्क झालं आहे. त्यामुळे राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता शिंदे गटातील आणि भाजपच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. यावरूनच सध्या अनेक चर्चा होत असून मंत्रिमंडळ विस्ताराला उधान आलं आहे. यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी येत्या 21 ते 26 मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तर ज्या चर्चा सुरू आहेत. त्यावरून हे आपण बोलत असल्याचे ते म्हणालेत. आणि जर यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही तर तो 2024 नंतरच होईल असेही ते म्हणालेत.