शिंदे-फडणवीस राजीनाम्यावर अजित पवार याचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले, वाजपेयी आणि यांच्यात...

शिंदे-फडणवीस राजीनाम्यावर अजित पवार याचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले, वाजपेयी आणि यांच्यात…

| Updated on: May 12, 2023 | 12:08 PM

त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विरोधकांसह एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी, आधीच्या काळातील राजकारण्यांची बात काही और होती.

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. न्यायालयाच्या या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर माजी मुखयमंत्री ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. तसेच नैतिकेच्या आधारे शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांसह एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी, आधीच्या काळातील राजकारण्यांची बात काही और होती. अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) आणि आताच्या काळातील नेते यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर कोणीही पायउतार होणार नाही, असे पवार म्हणाले. तर शिंदे-फडणवीस राजीनामा देतील असा विचारही करू नका, असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: May 12, 2023 12:08 PM