कोर्टाने ताशेरे ओढले आतातरी सरकार आत्मपरिक्षणार का? अजित पवारांचा सरकारला सवाल

कोर्टाने ताशेरे ओढले आतातरी सरकार आत्मपरिक्षणार का? अजित पवारांचा सरकारला सवाल

| Updated on: Mar 30, 2023 | 12:54 PM

आतातर कार्टाने नपुंसक म्हंटलं. मग आता कोणाला दोष द्यायचा? कोर्टाने याआधी कोणत्याही सरकारला नपुंसक सरकार म्हंटलं नाही असं अजित पवार म्हणाले

नाशिक : सुप्रीम कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढत नपुंसक म्हणत निरीक्षण नोंदवले. त्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी, सुप्रीम कोर्ट या सरकारला नपुंसक म्हणालं, मग हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा या सरकारचा अपमान नाही का? हा या सरकारचा कमीपणा नाही का असे सवाल केले. तसेच आता तरी हे सरकार आत्मपरिक्षण करणार का?’ असेही खडे बोल सरकारला सुनावले आहे.

सुप्रीम कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला नपुंसक म्हटल्यावरून अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी, आम्ही अधिवेशनाच्या वेळी 18 दिवस तेच संगत होतो. हे सरकार काय काम करत हे विचारल्यावर त्यांना राग येतो. आतातर कार्टाने नपुंसक म्हंटलं. मग आता कोणाला दोष द्यायचा? कोर्टाने याआधी कोणत्याही सरकारला नपुंसक सरकार म्हंटलं नाही. पण जर सर्वोच्च व्यवस्था राज्यातील सरकारला असं म्हणत असेल तर त्यांनी ही गांभीर्याने घेतलं पाहिजे. तातडीने त्यांनी मेहता यांना ते ऐकवलं पाहिजे. काय चुकलं हे चर्चा करून यावर विचारलं पाहिजे आणि आवश्यक ते बदल केले पाहिजेत असंही अजित पवार म्हणाले.

Published on: Mar 30, 2023 12:54 PM