हे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात तेढ वाढले : नाना पटोले
पटोले यांनी, न्यायालयाच्या या निर्णयाचा आम्ही स्वागतच करतो असे म्हटलं आहे. तर आपल्या देशाची लोकशाही ही संविधानाच्या विश्वासावर, विचारांवर चालते. मात्र हे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात धर्माधर्मामध्ये तेढ वाढले आहेत असं म्हटलं आहे
नागपूर : कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढत नपुंसक म्हणत निरीक्षण नोंदवले आहे. त्यावर राज्यातील विरोधी पक्षांनी टीका सुरू केली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारवर टीका करताना हे सरकार आतातरी आत्मपरिक्षण करणार का?’ असे खडे बोल सरकारला सुनावले. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कठोर शब्दात सरकारवर टीका केली आहे. तर या निरीक्षणामुळे सरकारचा खरा चेहरा हा सर्व सामान्यांच्या समोर आल्याचे म्हटलं आहे.
तसेच पटोले यांनी, न्यायालयाच्या या निर्णयाचा आम्ही स्वागतच करतो असे म्हटलं आहे. तर आपल्या देशाची लोकशाही ही संविधानाच्या विश्वासावर, विचारांवर चालते. मात्र हे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात धर्माधर्मामध्ये तेढ वाढले आहेत. हिंदू महासभेच्या नावाने भाजपचे मंत्री, आमदार दुसऱ्या धर्माला शिव्या घालायचे काम करतात. तर आमचा हिंदू धर्म हा कोणाचा द्वेष करू नका असं सांगतो. पण या हिंदू धर्माला बदनाम करण्याचं हे बीजेपी करत आहे. हे लोकांच्या आता लक्षात आलं आहे, असेही नाना पटोले म्हणाले.