Supriya Sule : राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, एक मंत्रालयात बसून काम करणारा आणि दुसरा…; सुप्रिया सुळेंचा शिंदेंना टोला
प्रशासन गेल्या अडीच महिन्यापासून ठप्प आहे. हे सरकार (Government) ज्या पद्धतीने सांगितले जाते ओरबडून आणि चुकीच्या पद्धतीने आलेला आहे आणि त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुंबई : सध्या राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची (CM) गरज आहे, एक मुख्यमंत्री जे मंत्रालयात बसून काम करू शकतील आणि दुसरे मुख्यमंत्री जे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. प्रभादेवीच्या सार्वजनिक मंडळाच्या गणेसोत्सवाला त्यांनी दिली भेट, त्यावेळी त्यांनी टोला लगावला. मी स्वतः अनेक मंत्र्यांना माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या कामांसाठी वेळ मागितली, पण ते वेळ देत नाहीत. याचा अर्थ प्रशासन गेल्या अडीच महिन्यापासून ठप्प आहे. हे सरकार (Government) ज्या पद्धतीने सांगितले जाते ओरबडून आणि चुकीच्या पद्धतीने आलेला आहे आणि त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत आहे. प्रशासनाबरोबर काम करणाऱ्या मंत्र्यांची राज्याला गरज आहे, असे मला वाटते, असे त्या म्हणाल्या.
Latest Videos