शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

| Updated on: Dec 31, 2024 | 5:31 PM

महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीविषयी चिंता व्यक्त करतानाच बीडचे प्रकरण असो किंवा परभणी दोन्ही प्रकरणात न्याय मिळायला हवा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृन हत्या आणि परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणात सोमनाथ सर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत झालेला मृत्यू या दोन्ही घटना महाराष्ट्राला लाजीरवाण्या आहेत असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला २२ दिवस उलटून गेले तरी आरोपी सापडत नाही. मात्र हाच आरोपी बिनधास्त व्हिडीओ काढून शेअर करतो आणि पोलिसांना, प्रसारमाध्यमांना त्याचा थांगपत्ता लागत नाही हे मोठे आश्चर्य असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. खरे महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला आदर आणि अभिमान आहे. आम्ही दिल्ली गेलो तरी महाराष्ट्र पोलिसांबद्दल आदराने बोलत असतो. आरोपी शरण येण्याचा प्रकार मनाला पटलेला नाही. त्याना खरे तर अटकच व्हायला हवी होती असेही त्यांनी म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणात महाराष्ट्राचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षीय बैठक घ्यायला हवी होती. त्यातून अशा घटना यापूढे होऊ नयेत यासाठी एक धोरण ठरवता आले असते असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 31, 2024 05:30 PM