मटण खावून देवदर्शन केल्याच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून उत्तर; अवघ्या सात शब्दात दूध का दूध पानी का पानी…
Supriya Sule Office clarification : शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी मटण खावून देवदर्शन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता त्यावर सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. पाहा...
पुणे : शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनीराष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे काही फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडिया शेअर केले. सुप्रिया यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतलं, असा आरोप शिवतारे यांनी केला. शिवतारे यांच्या या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांच्यावर टीका झाली. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. या सगळ्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे मागच्या काही वर्षांपासून शाकाहारी झाल्या आहेत. त्या मांसाहाराचं सेवन करत नाहीत, असं सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
Published on: Mar 05, 2023 12:02 PM
Latest Videos