अजित पवार यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे म्हणतात, “मला माहिती…”
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी देखील शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : रविवारचा दिवस हा राज्याच्या राकारणातला मोठा दिवस ठरला. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी देखील शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.”माझ्या आणि दादांमध्ये तेवढी प्रगल्भता आहे. कौटुंबिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य एकत्र करणार नाही. आज आम्ही वेगळ्या वळणावर आलो आहोत. दादाने विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला याची मला माहिती नव्हती. त्यांच्यासोबत किती नंबर आहेत ते मला माहिती नाही, काही वेळानंतर कळेल,” असही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Published on: Jul 03, 2023 07:54 AM
Latest Videos